लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.
भाईकाकाज लेटर टू मीरा ...Bhaikakas letter to Meera Pu La deshpande letters pu la deshpande books
चाळीसएक वर्षांपूर्वी पु.ल. देशपांडे मुंबईत वरळीला राहात होते. त्याच परिसरात असलेल्या आदर्शनगर वसाहतीत वेगवेगळी मातृभाषा असणारी मुलं तिथल्या मैदानावर खेळताना आपापसात ज्या `इंग्लिश' (खरं तर त्या भाषेला `मिंग्लिश'च म्हणावं लागेल!) भाषेत बोलत, त्याच भाषेत पु.ल. देशपांडे यांनी त्याच कॉलनीत राहणारी श्रीमती सुनीताबाई यांची भाची मीरा ठाकूर- आत्ताची डॉ. मीरा नगरकर- हिला ती शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पाठविलेलं हे पत्र! प्रथमच घेतलेल्या टाइपरायटरवर `बिब्लिकल मेथड' नं- म्हणजे `सर्च ऍंड दाऊ शॅल फाईंड- शोधा म्हणजे सापडेल' अशा पध्द्तीनं अक्षरपट्टीवरील मूळाक्षरं शोधत शोधत स्वत:च एका बोटानं टाईप केलेलं हे पत्र... पु.ल. देशपांडे यांच्या आजवरच्या प्रकाशित वाड:मयात नसलेलं!
मराठी बोध वाक्ये (Marathi Bodh Vakye) Marathi Mhani
1. कुणीही कस दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
2. पाण्यात राहायचे तर माशांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वताला मासा बनावे लागते.
3. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

पु.लं. चे काही किस्से Pu La, Pu La Deshpande, P L Deshpande , Pu La Kisse
१)
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
२)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .

Subscribe to:
Comments (Atom)