Showing posts with label मराठी उखाणे. Show all posts
Showing posts with label मराठी उखाणे. Show all posts

जानपद उखाणे - Ukhane

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात...........मोठे मोठे म्हणजे लांब उखाणे ज्यालाजानपद असे म्हणतात...........

१.
काळी डीचकी कंगोर्‍याची, आंत भाजी लिंबोर्‍याची, ईन मोठी ठकोर्‍याची,कुंकू लेती बारदानी , बारदानीचा आरसा, आरसा मागं परसा, परसांत होती केळं, केळीला आल्या तीन कळ्या, तीन कळ्यांची बांधली माडी, माडीवर होती तुळस, तुळशीची करतें सेवा
x x x रावांचा न् माजा जोडा जन्माला जावा
२.
संबूच्या शिखरावरी पाऊस पडतो झीरीमिरी, परका झाल्या बरोबरी, सुटली नानापरी,कोकणची भोरडी खडी काढण्या केल्या इलायावरी,गोळा केलं नदीवरी,खळं केलं सुर्यातळं, मोडाया सांगितल्या कोकणच्य़ा नारी , हात्तीवर हौदा, उंटावर झारी,कळस घ्यायला निघाली
x x x रावांची स्वारी, तर पाहतात मिळून नगराच्या नारी.
३.
रुणूझुणू येत होती, खिडकी वाटं पहात होती,खिडकीला तीन तारा, अडकित्त्याला घुंगरं बारा , पानं खाती तेरा तेरा
x x x राव बसले पलंगावर मी घालतें वारा.