Showing posts with label संदिप खरे. Show all posts
Showing posts with label संदिप खरे. Show all posts

दिवस असे की कोणी माझा नाही......Divas Ase Ki by Sandip Khare

दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही....
आकाशाच्या छत्री खाली भिजतो ,
आयुष्यावर हसणे थुंकुन देतो

या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणवत नाही.......!!!

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे
परि मजला गवसत नाही............!!!

मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यपिवा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो
परि नाव ठेववत नाही.........!!!

मम म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तूस्थितीचे डोळे ,
या जगण्याला स्वप्नांचाही आता
मेघ पालवत नाही...........!!!
दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही..........!!! 

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो..... Aatasha mi fakt rakane by Sandip Khare

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खर्डून कागद सहीसपाठवतो

व्याप नको मज कुठलाही अन्‌ताप नको आहे
उत्तर कुठले मूळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छ्ळावे त्यानां , त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भिती साठवते
डोंगर बघता ऊंची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्रही उरली पूर्वीगत हौशी
बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो

कळून येता जगण्याची या इवलिशी त्रिज्या
ऊडून जाती अत्तरापरी जगण्याच्य मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदॆव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो


Aatasha mi fakt rakane by Sandip Khare

मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले - Megh Nasata by Sandip Khare

मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले !

गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा ?
तू मला चोरून बघताना तुला मीपाहिले !

एवढे नाजुक आहे वय तुझे माझ्या फुला
रंगदेखील पाकळ्यांवर भार वाटू लागले !

लाख नक्षत्रे उराशी , नभ तरीही हळहळे
हे तुझे नक्षत्रवैभव का धरेवर राहीले ?

पाहता तुज रंग उडूनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले !

भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले !

बॉस …...- संदिप खरे....Boss by Sandip Khare

बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा…
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा…
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा…
मी लग्नाळलेला… वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून 

सुपरमँन - संदिप खरे...... Suparman by Sandip Khare

या कवितेचा विशेष म्हणजे ........
तीन कडवी तीन वेगवेगळ्या रसांमधली आहेत ‍‍ (वीर रस, करूण रस व भक्ती रस)











सुपरमँन सुपरमँन सुपरमँन







वरतून चड्डी आतून पँट


















अंगामध्ये ताकद फार, पोलादाची जणू पहार





पक्षी नाही तरी उडतो, मासा नाही तरी बुडतो





उडण्याचाही भलता वेग, पँरीस पनवेल सेकंद एक





रोज पृथ्वीला चकरा पाच, गेला म्हणता हा आलाच





गरुडाहूनही थेट नजर, जिथे संकटे तिथे हजर





कोसळती बस हा अडवी, फुंकरीत वणवा विझवी





अंतराळीचे व्हिलन कुणी, त्यांच्याशी दण्णादण्णी





अवघी दुनिया त्याची फँऽऽऽऽऽन






सुपरमँन सुपरमँन सुपरमँन







एवढंच ना? - संदिप खरे.....Evadach Na by SAndip Khare

एवढंच ना?













[ आयुष्यावर बोलू काही च्या उत्तरार्धाची सुरुवात अनेकदा या कवितेने होते. ]








एवढंच ना? एकटे जगू.. एवढंच ना?











आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू,


एवढंच ना?













रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू!

एवढंच ना?





दिवस असे की.......- संदिप खरे.......Divas Ase Ki by Sandip Khare

दिवस असे की











दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही







आकाश्याच्या छत्रीखाली भिजतो, आयुष्यावर हसने थुन्कुन देतो
आकाश्याच्या छत्रीखाली भिजतो, आयुष्यावर हसने थुन्कुन देतो
या हसन्याचे कारन उमगत नाही, या हसने म्हणवत नाही
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही







प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे, त्यावर नाचे मनीचे अबलक घोडे
प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे, त्यावर नाचे मनीचे अबलक घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे, परी मजला गवसत नाही
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही

क्षितिजाच्या पार........संदिप खरे.... Kshitijachya Par by Sandip Khare

क्षितिजाच्या पार










क्षितिजाच्या पार वेड्‌या संध्येचे घरटे


वेड्‌या संध्येच्या अंगणी रात थरथरते


कुणी जा दूर तशी मनी हूरहूर



रात ओलावत सूर वात मालवते...









आता बोलायाला कोण संगे चालायाला कोण

कोण टाकेल जीवाचे ओवाळून लिंबलोण


पायरीला ठसे दार खुले छत पिसे


कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते...


मन तळ्यात........- संदिप खरे..... Man Talyat by Sandip Khare

मन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात
मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजुकशा गळ्यात
उरी चाहुलिंचे मृगजल उरी चाहुलिंचे मृगजल
उरी चाहुलिंचे मृगजल

वाजे पाचोला उगी कशात

इथे वार्याला सांगतो गाणी माझे राणी
इथे वार्याला सांगतो गाणी

आणि झुलुक तुझ्या मनात

भिडू लागे रात अन्बालागी हो ........
भिडू लागे रात अम्बालागी

तुझ्या नखाची कोर नभात

माझ्या नयनी नक्षत्र तारा

माझ्या नयनी नक्षत्र तारा

माझ्या नयनी नक्षत्र तारा

आणि चाँद तुझ्या डोळ्यात

मन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात

मन तळ्यात........- संदिप खरे..... Man Talyat by Sandip Khare

लव्हलेटर.......- संदिप खरे.... Love Letter By Sandip Khare

लव्हलेटर.......



लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं






लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...- संदिप खरे.... Kitik Halave Kitik Sundar Aapule Antar

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी... माझ्यानंतर...
कितीक् हळवे, कितीक् सुंदर...








अवचीत कधी सामोरे यावे...


अन् श्वासांनी थांबून जावे...


परस्परांना त्रास तरीहि, परस्पराविण ना गत्यंतर...






कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...






मला पाहुनी... दडते-लपते,


आणिक तरीहि... इतूके जपते...

वाटेवरच्या फुलास माझ्या... लावून जाते हळूच फत्तर

गझल - संदिप खरे..... Ghazal by Sandip Khare

जुबा तो डरती है कहने से
पर दिल जालीम कहता है
उसके दिल में मेरी जगह पर
और ही कोई रहता है ॥ धृ ॥




बात तो करता है वोह अब भी
बात कहाँ पर बनती है
आदत से मैं सुनती हूँ
वोह आदत से जो कहता है ॥ १ ॥

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो....- संदिप खरे.....Mi Hazar Chintani He doke Khajavato

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.





मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो.





डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो.

नास्तिक - संदिप खरे...... Nastik By Sandip Khare

नास्तिक




एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !






एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण



देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !






एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो

सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

मी मोर्चा नेला नाही - संदिप खरे..... Mi Morcha Nela Nahi

मी मोर्चा नेला नाही









मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही






भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही






नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने

पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

सरीवर सर… - संदिप खरे........... Sarivar Sar by Sandip Khare

सरीवर सर…







दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..







तडा तडा गार गारा गरा गरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..


दूरदेशी गेला बाबा...- संदिप खरे..... DurDeshi Gela Baba

दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!






कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला

चार भिंतित धावुन दिसभर दमवला

' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! १ !!






कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! २ !!






दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही

दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही

फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!






नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा......

दूरदेशी गेला बाबा...- संदिप खरे..... DurDeshi Gela Baba by sandip Khare lyrics marathi lyrics

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला? - संदिप खरे....... Yein Swapnat Mitalya Dolyat Gheshil ka Mala...

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??

तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??








वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग

वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग

वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??


तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

काय रे देवा...- संदिप खरे......Kay Re Deva

काय रे देवा...











आता पुन्हा पाऊस येणार



आकाश काळ निळ होणार



मग मातीला गंध सुटणार



मग मध्येच वीज पडणार



मग तुझी आठवण येणार



काय रे देवा...











मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार

मग मी ती लपविणार



मग लपवूनही ते कुणालातरी कळावस वाटणार

मग ते कुणीतरी ओळखणार



मग मित्र असतील तर रडणार



नातेवाईक असतील तर चिडणार


मग नसतच कळल तर बर अस वाटणार


आणि या सगळ्याशी तुला काहीच घेण देण नसणार..

मी फसलो म्हणूनी...-संदिप खरे....... Mi Phasalo Mhanuni

मी फसलो म्हणूनी...












































संदीप : या कवितेविषयी आधी थोडंसं सांगतो...की हातामधून हात सुटून जातो, ................
पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ..........
ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. ......
आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता -
























मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी


















ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी










































ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते



















कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते


















संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते



















ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते