शिवचरित्रमाला - भाग ९ - चंदग्रहण


शहाजीराजे प्रत्यक्ष तुरुंगातून सुटले तरीही ग्रहणकाळ संपला नाही. मोहम्मदआदिलशाहने शहाजीराजांना कैदेतून मुक्तकेलं. पण त्यांना हुकूम केला की आमची परवानगी मिळेपर्यंत तुम्ही विजापूर शहरातच राहायचं. बाहेर कुठेही अजिबात जायचं नाही. 

अतिशय धूर्तपणानं आणि सावधपणानंशहानं हा हुकूम दिला. म्हणजेशहाजीराजांना त्यानं विजापुरात स्थानबद्ध केलं. याचा परिणाम शिवाजीराजांच्या उद्योगांवर आपोआप झाला. शहानं या मार्गानं शिवाजीराजांना धाकच दाखविला की बघ तुझा बाप मुक्त असला तरीही विजापूरात तो आमच्याच पंजाखाली आहे. जर तू सह्यादीच्या पहाडात गडबडकरशील तर अजूनही तुझ्या बापाचे प्राण जातील याद राख. 

धूर्त शहाने शिवाजीराजांच्या हालचाली साखळबंद करून टाकल्या. 

पण गप्प बसणं हा शिवधर्मच नव्हता. ते एक तुफान होतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला विजेचे पंख होते. राजांचं भीमा नदीच्या उत्तरेकडे थेट दिल्लीपर्यंत लक्ष होतं. आज ना उद्या पण लवकरात लवकर आपल्याला भीमा ओलांडून मोगलाई सत्तेवर नक्कीच चढाई करायची आहे हे लक्षात घेऊन महाराज वागत होते. भीमेच्या उत्तरेला थेट काश्मीरपर्यंत शहाजहानचं मोगली साम्राज्य होतं. तसंच केव्हातरी सह्यादी ओलांडून मावळतीला असलेल्या कोकणपट्टीवर आपल्याला उतरायचं आहे आणि कोकणचा समुद आपल्या ओंजळीत घ्यायचाय हीही महत्त्वाकांक्षा त्यांचीहोतीच. कोकणात सत्ता विजापूरकरांची होती. पण त्यातही सिद्दीनं आपली जबरदस्त सत्ता जंजिऱ्याच्या सागरी किल्ल्यावर थाटली होती. एखाद्या बेटांवर आणि गोमांतकात पोर्तुगीज फिरंगी जुलूम गाजवत होते. एकूण अवघं कोकण काबीज करणं म्हणजे सुसरी- मगरींशी झुंज देण्याइतकं अवघड काम होतं. अशक्यप्राय! 

महाराजांची सावध महत्त्वाकांक्षा सह्यादीवरून पश्चिम पायथ्याशी पसरलेल्या कोकणावरतीडोकावून डोकावून फिरत होती. झडप घालयाची होती. पण शहाजीराजे जोपर्यंत विजापूर शहरात शाही पंजाखाली स्थानबद्ध आहेत तोपर्यंत काहीही करता येत नाही. याची जाणीव त्यांना होती. गप्प बसवत नव्हतं. पण काहीच करता येत नव्हतं. पण आपल्याच लहानग्यास्वराज्याचं बळ ते वाढवित होते. पायदळ घोडदळ हेरखातं परराष्ट्रवकील खातं जमीन महसूल रयतेच्या अडीअडचणी इत्यादीत ते अविश्रांत गुंतले होते. 

हेरगिरी करणारं नजरबाज खातं बहिरी ससाण्यासारखं स्वराज्याभोवती शत्रूच्या मुलखांतभिरभिरत होतं. नानाजी विश्वासराव दिघे बहिजीर् नाईक जाधव आणि असेच चतुर हेर त्यात होते. पुढे संुदरजी परभुजी आणि वल्लभदास या नावाचे दोन चतुर गुजराथी हेरागिरीसाठीमहाराजांना गवसले. निवडून निवडून आणि पारखून पारखून महाराज माणसं मिळवत होते. घडवत होते. यात जातीधर्माचं बंधन नव्हतं. 

सामान्य माणसांतून असामान्य माणसं घडविण्याचा हा शिवप्रकल्प होता. अत्रे बोकील पिंगळेआवीर्कर राजोपाध्ये हणमंते पतकी अन् अशाच कुळकर्ण करीत खडेर्घाशी करणाऱ्या किंवा हातात दर्भाची जुडी अन् पळीपंचपात्री घेऊन गावोगांव श्राद्धपक्षाची पिंडं पाडणाऱ्या वालग्नमुंजीच मंगलाष्टक तारस्वरात ओरडत हिंडणाऱ्या.... पण तल्लख बुद्धी काळजात हिम्मत आणि मनगटात तलवारीची हौस असलेल्या निवडक भटाभिक्षुकांचे गुण अचूक हेरून त्यांनाहीराजकारणाच्या आणि रणांगणांच्या आखाड्यात उतरविणारे महाराज अठरापगड अवघ्या मऱ्हाठी जातीजमातीलाही आपल्या हृदयाशी धरीत होते स्वराज्याच्या कामाला गुंफीत होते. हे राज्य एक आहे आम्ही सारे एक आहोत अन् श्रींच्या इच्छेप्रमाणे हे राज्य आम्ही वैभवशाली करणार प्रतिपद्चंदलेखेव आहोत ही गगनालाही ठेंगणी बनविणारी महत्त्वाकांक्षा धरीत होती. महाराजांचा पहिला पायदळ सेनापती होता नूरखान बेग सरनोबत बहिजीर् नाईक जाधव हा रामोशी होता. महार प्रभू धनगर सोनार शिकलगार कहार चांभार भांग किती जाती जमातींची नावं घेऊ शहाण्णव कुळीच्या मराठ्यांपासून ते चंदपूर गोंडवनातीलउघड्यावाघड्या गोंडांपर्यंत अवघ्यांचा भोंडला सह्यादीच्या भोवती महाराज मांडीत होते. त्यांना 'अवघ्या मऱ्हाठी यांचे गोमटे करावयाचे होते. त्यासाठी हा स्वराज्याचा मनसुबा त्यांनी मांडलाहोता. शहाजीराजांच्या स्थानबद्धतेमुळे ते सह्यादीच्या शिखरांपाशीच थबकले होते. खोळांबले होते. कोकणात डोकावून डोकावून बघत होते. त्यांना कोकणचं वैभव दिसत होतं. अन् गरीब रयतेचे हालही दिसत होते. कोकणात आंबा पिकत होता. रस गळत होता कोकणचा दर्या राजा झिम्मा खेळत होता. शेतकरी राजा अर्धपोटी राहत होता तरीही जगत होता. 

हबश्यांच्या अन् फिरंग्यांच्या अत्याचारांचे फटके खात होता. तरीही नवी आशेची स्वप्न पाहत ,दु:ख उशाखाली झाकून झोपत होता. कोकणातल्या त्या आगरी कुणबी कोळी भंडारी ,मालवणी अन् गांवकर मंडलींना पहाटेच्या स्वप्नात शिवाजीराजे दिसत असल्यास काय 

अन् याच काळात (इ. स. १६४९ १६५२ महाराजांच्या चाणाक्ष हेरांनी कोकणपट्टी हेरली. सुख दु:ख अपमान अत्याचार आणि आशेचे किरणही हेरले. समिंदर हेरला किनारा हेरला. लबाड हेरले वैरी हेरले. इमानी अन् कष्टाळूही हेरले. 

महाराजांची झेप पडणार होती. कोकणपट्टीवर उद्या परवा ते अवलंबून होतं. शहाजीराजांच्या पुढच्या परिस्थितीवर. पण याच काळात महाराजांचं बळ त्यांच्या तळहाताएवढ्या स्वराज्यात सुपाएवढं वाढत चाललं होतं. 

पण नियती मोठी द्वाड. एका बाजूनी पंखात बळ वाढवित होती तर दुसऱ्या बाजूनी तीच नियती पंखांवर भयंकर आघात करीत होती. याच काळात (इ. स. १६४९ फाल्गुन) जगद्गुरू तुकाराम महाराज अचानक हे जग सोडून गेले.