शिवचरित्रमाला - भाग ८७ - सिंहगडाचंच, एक वेगळं पान

सिंहगडावर पाण्याची 33 टाकी आहेत. कालभैरव अमृतेश्वर कोंढाणेश्वर महादेव ,नृसिंह मारुती गणपती गडाच्या रामदऱ्यात भवानी अशी देवदैवतेही आहेत. पूवेर्कडच्या कंदकड्यावर सुबक तटबुरूज आहेत. खोल गुहेत गारगार अन् काचेसारखंस्वच्छ पाणी आहे. याला म्हणतात सुरुंगाचे पाणी. यादवकाळातील एखाद्या सुंदर मंदिराचे पडकेमोडके अवशेषही अस्ताव्यस्त पडलेले आहेत. याच गडावर पुढे मार्च १७०० या दिवशी शिवछत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू घडला. त्यांचे दहन जेथे झाले त्या जागेवर पुढे महाराणी छत्रपती राजमाता ताराबाईसाहेबयांनी समाधीमंदिर बांधले. तानाजी मालुसऱ्यांचीही नंतर बांधलेली समाधी आणि त्याही नंतर बसविलेला अर्धपुतळा गडावर आहे. 

या गडावरचं 
तरुणांचं अपरंपार प्रेम सतत आमच्या प्रत्ययास येत गेलं आहे. गडाच्या दोन्हीवाटांनी तरुण या गडावर येतात हसतात खेळतात बागडतात. दही दूध पितात घरी जातात. क्वचित कोणी धाडसी मुलगा आडरान वाटेनं पायी गड चढून येण्याचा हौशी डाव यशस्वी करतो.कधी कोणी दोर सोडून गडावर चढण्या उतरण्याचा डाव करतो. आपण अश्विन विद्याधर पुंडलिक हे नाव ऐकलं असेल. अनेकांच्या तर तो ओळखीचा खेळगडीच होता. अश्विन धाडसी होता. बिबट्या वाघासारखे त्याचे काहीसे घारे असलेले डोळे पाहिले की असं गमतीनं वाटायचं की हे पोरगं सिंहगडावरच्या गुहेतच सतत नांदत असावं. 

शतकाचं 
पावकं काळाच्या निठव्यात भरायला आलं असावं. त्या दिवशी अश्विन सिंहगडावर गेला. झपझप चढला. त्या दिवशी गडावर गेल्यानंतर कल्याण दरवाज्याने तो बाहेर पडला. अन् गडालाउजवा वळसा घालून पश्चिमेच्या डोणागिरीच्या कड्याखाली आला. उंच भिंतीसारखा ताठ कडा दिसतोय. हाच तो कडा. या कड्यावरून तानाजी सुभेदार जसे चढले तसाच अश्विन हातापायाची बोटं कड्यावरच्या खाचीत घालून शिडीसारखा चढू लागला. नेहमीच असले खेळ रानावनात अन् घाटाखिंडीत खेळणारा अश्विन पूर्ण आत्मविश्वासाने सिंहगडाचा कडा आपल्या बोटांनी आपल्या वीस बोटांनी चढत होता. वितीवितीने तो वर माथ्याकडे सरकत होता. हे कडा चढण्याचे जे तंत्र आहे ना त्यात एक गोष्ट निश्चित असते. की मधेअधे कुठे थांबायला मिळत नाही. अन् मधूनच पुन्हा माघारी फिरता येत नाही. एकदा चढायला सुरुवात केली की वर माथ्यावर पोहोचलंच पाहिजे. अश्विन चढत होता. पुरुषभर गेला. दोन पुरुष तीन पुरुष चार पुरुष पाच पुरुष सहा पुरुष सात आठ नऊ दहा अकरा पुरुषांपर्यंत वर गेला. अन् पूर्णपणे अगदी सफाईनं माथ्यावर पोहोचलाही. गिर्यारोहणाचा तो आनंद सोफा सेटवर कळणार नाही. अश्विन आनंदात होता. दमला असेल थोडाफार घामही आला असेल. माहीत नाही. पण त्याचा आनंद तर्काच्या पलिकडं जाऊनही लक्षात येतो. तो माथ्यावर पोहोचला अन् त्याच्यामनाने चेंडूसारखी उसळी घेतली. तो या कड्यापासून पुन्हा गडाच्या कल्याण दरवाजाकडे निघाला. कल्याण दरवाज्यातून पुन्हा बाहेर पडला. गडाला उजवा वळसा घालून पुन्हा त्याचडोणागिरीच्या कड्याच्या तळाशी आला. अन् पुन्हा तोच कडा आपल्या वीस बोटांनी चढू लागला. आत्मविश्वासाची एक जबर फुंकर त्याच्या मनावर इतिहासाने घातली होती. हा इतिहास अर्ध्या पाऊण तासांपूवीर्च घडला होता. तो त्यानेच घडविला होता. पुन्हा आणखीन एक तसेच पान लिहिण्यासाठी अश्विन कडा चढू लागला. 

अश्विन चढत होता. एक पुरुष. एक 
पुरुष म्हणजे सहा फूट. घोरपडीच्या नखीसारखी त्याची बोटं वर सरकत होती. दोन पुरुष. तीन पुरुष. चार पाच सहा सात अन् आणखीन किती कोणजाणे. अश्विन वर सरकत होता आणि काय झालं कसं झालं कळले नाही कोणाला. अन् अश्विनचा पाय किंवा हात सटकन निसटला. खडकांवर आदळत आपटत अश्विन डोणागिरीच्या तळाला रक्तात न्हाऊन कोसळला. 

हे 
दु:ख शब्दांच्या पलिकडे आहे. सिंहगडही गुडघ्यांत डोकं घालून ढसढसा रडला असेल. 

अश्विन गेला. त्याचं 
घर त्याच्या मित्रांची घरं अन् सारेच पुंडलिक परिवारातले सगेसोयरेनाकातोंडात दु:ख असह्य होऊन तळमळू लागले. 

होय. हे फार मोठं 
दु:ख आहे. असे अपघात कड्यावर नद्यांच्या महापुरात कधी जीवघेण्याशर्यतीत तर कधी खेळतानाही घडलेले आपण पाहतो. 

यावर उपाय 
काय धाडस साहस हे शिपाईपणाचे खेळ खेळायचेच नाहीत का नाही. खेळले पाहिजेत. जास्तीत जास्त दक्षता घेऊन खेळले पाहिजेत. त्यातूनच शिपाईपणा अंगी येतो ना! 

आज महाराष्ट्रभर तरुण मुलंमुली असे 
काही कमीजास्त धाडसाचे खेळ खेळताना दिसतात. एका बाजूने ते पाहताना आनंद होतो. दुसऱ्या बाजूने मन धास्तावतं या मुलांना म्हणावसं वाटतं ,छान पण पोरांनो याही तुमच्या खेळातले नियम शिस्त गुरुची शिकवण अन् धोक्याचे इशारे डावलू नका. खूप खेळा. खूप धाडसी व्हा. मोठे व्हा.